T20I क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर भारताचा दबदबा कायम; एशिया कपमध्ये इतक्या वेळा दिला पराभव…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. एशिया कप 2025 मध्ये पुन्हा एकदा हे दोन प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. हा महामुकाबला 14 सप्टेंबरला रंगणार असून, या मोठ्या टूर्नामेंटसाठी दोन्ही संघांची स्क्वॉड आधीच जाहीर झाली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 T20I सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तब्बल 10 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान फक्त 3 वेळाच विजयी झाला आहे. त्यामुळे T20I क्रिकेटमध्ये भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे.

दोन्ही संघांमध्ये शेवटचा T20I सामना T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये झाला होता. त्या सामन्यात भारताने 6 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत फक्त 14 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या आणि एकहाती सामना फिरवला होता.

T20 एशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. त्यापैकी 2 भारताने जिंकले असून फक्त 1 पाकिस्तानच्या खात्यात गेला आहे. त्यामुळे या स्पर्धेत देखील भारताचे वर्चस्व कायम आहे.

एशिया कप 2025 साठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर उपकर्णधारपद शुभमन गिलला देण्यात आले आहे. संघात तरुणाई आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. जसप्रीत बुमराहची पुनरागमन झाली असून, या स्पर्धेतून भारतीय संघ वर्ल्ड कपपूर्वी योग्य कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करेल.

एशिया कप २०२25 सती इंडियन युनियन – सूर्यकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल (उपशार), अभिषेक शर्मा, टिळ वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्कर पटेल, जितेश शर्मा (विकेटीपर) संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा, रिंकू सिंग.

Comments are closed.