शेअर बाजारात विक्रमी तेजी; सेन्सेक्स, निफ्टीने गाठले नवे उच्चांक

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर देशातील शेअर बाजार दबावाखाली होता. तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सातत्याने मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याने बाजारात मोठी घसरण होत होती. मात्र, स्थानिक गुंतवणूकदारांनी बाजारावर विश्वास दाखवत खरेदी केल्यामुळे गेल्या आठवड्यात बाजार त्यांच्या उच्चांकाजवळ पोहचले होते. तेजीचा हाच सिलसिला सोमवरी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला आहे.
आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या आठवड्यात देसाचे जीडीपीबाबतची आकडेवारी जाहीर झाली. त्यात जीडीपीमध्ये चांगली वाढ दिसून आली. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आणि बाजार उच्चांकावर पोहचला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सर्व विक्रम मोडले आणि उघडताच नवीन उच्चांक गाठले. तसेच बँक निफ्टीनेही 60 हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्सने ८६,१५९ चा नवा उच्चांक गाठला, तर एनएसई निफ्टीनेही जोरदार सुरुवात करत २६,३२५ चा नवा उच्चांक गाठला. अदानी पोर्ट्स, बीईएल आणि टाटा स्टील सारख्या प्रमुख समभागांनी सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदवली. देशाच्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीने बाजारात नवी तेजी आली आहे.
शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच, बीएसई सेन्सेक्सने मागील सर्व विक्रम मोडले. ३० शेअर्सचा निर्देशांक ८६,०६५.९२ वर उघडला आणि त्यानंतर लगेचच तो ८६,१५९.०२ वर व्यवहार करत होता, जो त्याचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक होता. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० देखील जोरदार तेजीसह उघडला आणि त्याच वेळी एका नवीन शिखरावर पोहोचला. हो, तो २६,३२५.८० वर उघडला, तो त्याचा ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे.

Comments are closed.