17 षटकार, 17 चौकार अन् 256 धावा! अभिषेकच्या वादळानंतर हार्दिक-तिलकचा तडाखा; टीम इंडियाने रचला इ
T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताची सर्वोच्च धावसंख्या: टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 256 धावांचा डोंगर उभा केला. हा स्कोअर टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा टोटल ठरला आहे. इतकंच नव्हे, तर यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या आहे. दीर्घ काळानंतर अभिषेक शर्माची बॅट खऱ्या अर्थाने गरजली. यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाईच केली. दोघांनीही आक्रमक फटकेबाजी करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघावर प्रचंड दडपण आणलं.
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विक्रमी धावांचा पाऊस
2026च्या टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा स्कोर सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या नावावर होता. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 254 धावा चोपून हा विक्रम केला होता. मात्र आता त्याच झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाने 256 धावा ठोकत नवा इतिहास घडवला आहे.
पण, टी-20 वर्ल्ड कपच्या एकूण इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या अजूनही श्रीलंका क्रिकेट संघ यांच्या नावावर कायम आहे. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध तब्बल 260 धावा केल्या होत्या. भारत हा जागतिक विक्रम मोडण्यापासून अवघ्या 4 धावांनी दूर राहिला.
टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठे स्कोर
- 260 धावा – श्रीलंका (विरुद्ध केनिया)
- 256 धावा – भारत (विरुद्ध झिम्बाब्वे)
- 254 धावा – वेस्ट इंडिज (विरुद्ध झिम्बाब्वे)
- 235 धावा – आयर्लंड (विरुद्ध ओमान)
अभिषेक शर्माचा दमदार कमबॅक
या वर्ल्ड कपमधील पहिल्या तीन डावांत अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यातही त्याला फक्त 15 धावांवर समाधान मानावे लागले होते. मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्याचा खरा स्फोट पाहायला मिळाला. अभिषेकने अवघ्या 26 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाचे संथ अर्धशतक ठरले.
हार्दिक–तिलकची तुफानी भागीदारी
अभिषेकनंतर हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी अवघ्या 31 चेंडूमध्ये 84 धावांची जबरदस्त भागीदारी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धू धू धुतले. हार्दिक पांड्या 23 चेंडूमध्ये 50 धावा ठोकत नाबाद परतला, तर तिलक वर्माने त्याहूनही आक्रमक फलंदाजी करत 16 चेंडूमध्ये 44 धावांची स्फोटक खेळी केली. या दोघांनी मिळून 8 षटकार आणि 5 चौकार लगावत स्टेडियम दणाणून सोडले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.