भारत-आयर्लंड सामन्याची वेळ बदलणार! या वेळेत रंगणार सामना; जाणून घ्या सविस्तर

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी २० सामने २६ आणि २८ जून रोजी होणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय टीम बेलफास्टला पोहचली आहे. या टीममध्ये १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशीही आहे. ज्याच्यावर कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा आहेत. याच T20 सीरिजबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

२६ आणि २८ जून रोजी होणारे टी २० सामने हे आपल्या नियोजित वेळेपेक्षा एक तास आधी सुरु होतील. गुरुवारी क्रिकेट आयर्लंडने ही माहिती दिली की दोन्ही सामने वेळेच्या एक तास आधी सुरु होतील. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हे सामने सुरु होतील. याआधी हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार होते.

दोन्ही सामन्यांची वेळ बदलण्यामागे एक खास कारण आहे. वुमन्स टी २० विश्वचषक २८ जूनला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा ग्रुप एचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. भारतीय महिला संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियाला सामना जिंकावा लागणार आहे. अशावेळी क्रिकेट आयर्लंडला हे वाटत नाही की दोन्ही सामने एकाच वेळी प्रसारित व्हावा आणि प्रेक्षकांना दोन्ही पैकी एका सामन्याची निवड करावी लागावी म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना टी २० आणि महिला टीमचा सामना या दोन्ही सामन्यांचा आनंद लुटता येईल.

हे कारण जरी असलं तरीही वैभव सूर्यवंशी या सीरिजमधून डेब्यू करणार आहे. आयपीएल २०२६ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय डेब्युची चर्चा आहे. वैभवने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेतील ट्रायंगुलर सीरिजच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने श्रीलंकेच्या विरोधात ११ चेंडूत ५० धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाने सर्वात कमी चेंडूत केलेलं हे वेगवान अर्धशतक आहे. त्याआधी आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने ७७६ धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट २३७.३१ इतका राहिला. तसंच त्याने अनेक रेकॉर्ड्स केले. आयर्लंडला पोहचल्यानंतर वैभव सूर्यवंशी सातत्याने चर्चेत आहे.

Comments are closed.