हिंदुस्थाननं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे बंद केलंय! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आसियान (ASEAN) शिखर परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. मलेशियामध्ये ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. या भेटीपूर्वी त्यांनी हिंदुस्थानबाबत मोठे विधान केले. हिंदुस्थान रशियाकडून तेल आयात पूर्णपणे बंद केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानवर रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी दबाव टाकला. हळूहळू हिंदुस्थान रशियाकडून तेल आयात पूर्ण बंद करेल असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र हिंदस्थानने यावर प्रतिक्रिया देताना ऊर्जेसंबंधीचे निर्णय राष्ट्रीय हितावर आधारित असतील असे म्हटले होते. यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानने रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवल्याचे म्हटले आहे. शनिवारी एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी संवाद साधतांनी त्यांनी हा पुनरुच्चार केला.

Comments are closed.