आपल्या शेजार्‍यांमध्ये भारत भाग्यवान नाही: राजनाथ सिंह

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाची सुरक्षा केवळ सीमेवर लढलेल्या युद्धाने ठरत नाही, तर ती पूर्ण देशातील लोकांचा संकल्प आणि एकजुटतेने ठरत असते असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 1965 च्या युद्धाच्या दिग्गजांसोबतच्या संवादादरम्यान काढले आहेत. भारत स्वत:च्या शेजाऱ्यांसोबतच्या संबंधांप्रकरणी सुदैवी राहिलेला नाही. परंतु आम्ही याला नियति मानलेले नाही. आम्ही आमचे भविष्य स्वत:च ठरविले असून याचे एक उदाहरण ऑपरेशन सिंदूर असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.

आम्ही पहलागमच्या भयावह घटनांना विसरलेलो नाही आणि जेव्हा आम्ही त्या घटना आठवतो, तेव्हा आमचे मन विषण्ण होत क्रोधाने भरून जाते. तेथे जे काही घडले, त्याने आम्हा सर्वांना हादरवून टाकले होते. परंतु ती घटना आमचे मनोबल तोडू शकली नाही असे वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी केले.

आमच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा संकल्प केला होता. आम्ही ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि आमचा प्रतिरोध किती मजबूत आणि शक्तिशाली आहे हे शत्रूंना दाखवून दिले. आमच्या पूर्ण टीमकडून दाखविण्यात आलेला समन्वय आणि शौर्याने विजय आता कुठलाच अपवाद नसल्याचे सिद्ध केले. विजय आता एक सवय ठरला असून आम्हाला हीच सवय कायम राखावी लागणार असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.

विजय सामूहिक संकल्पाचा परिणाम

कुठलेही युद्ध केवळ युद्धभूमीवर लढले जात नाही, तर युद्धात प्राप्त विजय पूर्ण राष्ट्राच्या सामूहिक संकल्पाचा परिणाम असतो. 1965 च्या त्या कठिण काळात जेव्हा चहुबाजूला अनिश्चिता आणि आव्हाने होते, तेव्हा देशाने लालबहादुर शास्त्राr यांच्या दृढनेतृत्वात त्या आव्हानांचा सामना केला. शास्त्राRनी त्या काळात निर्णायक राजकीय नेतृत्व प्रदान केले, तसेच पूर्ण देशाचे मनोबल उंचावले होते. त्यांनी दिलेला नारा आजही आमच्या मनात स्थान मिळवून आहे. ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्यात आमच्या शूर जवानांच्या सन्मानासोबत आमच्या अन्नदात्यांचा गौरवही सामील होता, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Comments are closed.