IND vs ENG: टीम इंडियाचा फायनलचा रस्ता रोखू शकतात इंग्लंडचे ‘हे’ 5 खेळाडू; सेमीफायनलपूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा

जगातील कोणत्याही संघाला आतापर्यंत सलग दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारतीय संघ हा पराक्रम करण्यापासून आता फक्त दोन पाऊल दूर आहे. 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होईल (IND vs ENG). पण भारताचा फायनलचा रस्ता इंग्लंडचे 5 घातक खेळाडू रोखू शकतात.

हॅरी ब्रूक (कर्णधार)
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक (Harry Brook) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून आतापर्यंत 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 228 धावा केल्या आहेत. भारताला त्याच्यापासून विशेष सावध राहावे लागेल.

विल जॅक
विल जॅक्सने (Will jacks) या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला आहे. त्याने 177 च्या स्ट्राइक रेटने 191 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीतही 7 विकेट्स घेतल्या आहेत. आशियाई खेळपट्ट्यांवर त्याची अष्टपैलू कामगिरी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.

सॅम कुरन
सॅम करन (Sam curren) हा इंग्लंडचा खरा ‘तुरुपचा एक्का’ ठरला आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने छाप पाडली आहे. त्याने आतापर्यंत 149 धावा केल्या असून 6 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

फिल सॉल्ट
साल्टचा (Philll Salt) फॉर्म सध्या थोडा नरम असला, तरी तो कधीही सामना फिरवू शकतो. विशेष म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 220 चा आहे, जो भारतीय गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा आहे.

आदिल रशीद
इंग्लंडच्या फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करणारा आदिल रशीद (Adil Rashid) खूप अनुभवी आहे. त्याने 7 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या असून त्याची इकॉनॉमी 8 पेक्षाही कमी आहे. मधल्या ओव्हर्समध्ये तो भारतासाठी घातक ठरू शकतो. भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडच्या या 5 खेळाडूंना रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

Comments are closed.