ऑस्ट्रेलिया पुन्हा टेबल टॉपर, तर सलग दोन पराभवानंतर Points Table मध्ये टीम इंडिया कुठे? जाणून घ
आयसीसी महिला विश्वचषक 2025 गुण सारणी अद्यतनित: आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women’s World Cup 2025) मधील 13व्या लीग सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) महिला संघ आमनेसामने आले. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या रोमांचक लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 48.5 षटकांत 330 धावांचा डोंगर उभारला. मात्र, ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ करत 49व्या षटकात 7 गडी गमावून हे लक्ष्य पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये (ICC Women’s World Cup 2025 Points Table) अव्वल स्थान मिळवले असून, टीम इंडियाला पराभवाचा फटका बसला आहे. आता भारताला टॉप-4 मध्ये टिकून राहण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे.
𝐀 #𝐂𝐖𝐂𝟐𝟓 c𝐥𝐚𝐬𝐬𝐢𝐜 🔥
महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक-यशस्वी पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची मज्जातंतू घेतली आहे 👏#Indvaus 📝: https://t.co/ll6vmwzbmi pic.twitter.com/xkfutbomdj
– आयसीसी (@आयसीसी) 12 ऑक्टोबर, 2025
ऑस्ट्रेलिया पुन्हा टेबल टॉपर, भारत तिसऱ्या स्थानावर (Australia goes top of table after beating India)
ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून इतिहास रचल्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघ वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कंगारू संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामने जिंकले आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचे एकूण 7 गुण आणि +1.353 नेट रनरेट आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची महिला टीम आहे, जिने 3 सामन्यांत 3 विजय मिळवले असून त्यांचा नेट रनरेट +1.864 आहे. भारतीय महिला संघ पराभवानंतर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, पण त्यांचा नेट रनरेट घसरला आहे. टीम इंडियाने 4 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकले आणि 2 हरले आहेत. भारताचा सध्याचा नेट रनरेट +0.682 आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्यांनी 3 सामन्यांत 4 गुण मिळवले असून त्यांचा नेट रनरेट -0.888 आहे.
न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर, पाकिस्तान तळाशी
गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे, त्यांच्याकडे 3 सामन्यांतून 2 गुण असून नेट रनरेट -0.245 आहे.
तळाच्या तीन स्थानांवर आशियाई संघ आहेत, बांग्लादेशने 3 पैकी 1 सामना जिंकून सहावा क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका एकाच गुणासह सातव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तीनही सामने हरल्यानंतर शेवटच्या पायरीवर म्हणजे आठव्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना निर्णायक ठरणार
हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आधी दक्षिण आफ्रिका आणि आता ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर कायम असला तरी संघाचा नेट रनरेट (+0.682) घसरला आहे. पुढचा सामना 19 ऑक्टोबरला इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे, इंग्लंडचा अजूनपर्यंत एकही पराभव झालेला नाही, त्यामुळे हा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.