‘दादा’ ठरला असता एक्स फॅक्टर, संघात ‘सूर्या’ नसल्यानं भारताला फटका? माजी खेळाडूचा BCCI वर संताप

टीम इंडियाचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणाऱ्या 6 खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन यांचा समावेश आहे. तर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवची संघात निवड झाली नाही म्हणून माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना बीसीसीआयवर चांगलाच संतापला.

सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, जर सूर्यकुमार संघात असता तर तो एक्स फॅक्टर असता. संघाला त्याची उणीव भासेल. आता जबाबदारी सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या टॉप तीन फलंदाजांवर असेल. सूर्यकुमार असा खेळाडू आहे जो मैदानावर कोणत्याही ठिकाणाहून शॉट मारू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो

भारतासाठी सूर्याने खेळले 37 एकदिवसीय सामने

सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात शॉट मारण्याची क्षमता आहे. त्याने 2021 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 773 धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.

सिराज संघात परत येणार?

या महिन्याच्या सुरुवातीला सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. तर दुसरीकडे टाचेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शमीने 2023 च्या वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सुरेश रैना म्हणाले की, सिराज अजूनही संघात स्थान मिळवू शकतो. सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली गोलंदाजी केली. 12 फेब्रुवारीपर्यंत संघात बदल करू शकता. त्यामुळे मला वाटतं जर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर सिराज संघात परत येऊ शकतो.

रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करेल तर युवा प्रतिभावान फलंदाज शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रैनाने या निर्णयाला दूरदर्शी पाऊल म्हटले. तो म्हणाला की, “गिलला योग्य वेळी उपकर्णधारपद मिळाले आहे. तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार आहे आणि त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहितला माहित आहे की एका युवा खेळाडूला कसे तयार करायचे आणि गिल संघासाठी काय खास करू शकतो.”

भारताने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2002मध्ये पहिल्यांदाच तो श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता बनला, तर 2013 मध्ये दुसऱ्यांदा त्याने ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या संघात चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे, असे रैनाचे मत आहे.

हे ही वाचा –

Rinku Singh Viral Video : तू घे…तू घे… हातात नोटांचं बंडल घेऊन रिंकू सिंगने पाडला पैशांचा पाऊस, वेटरपासून शेफर्यंत सगळ्यांना केलं मालामाल

अधिक पाहा..

Comments are closed.