भारतासाठी नेपाळ नेहमीच खास! दोन्ही देशांमध्ये किती होतो व्यापार? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारत नेपाळ व्यापार: भारताचा (India) शेजारी असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. सोशल मीडियावर आलेल्या बंदीच्या निमित्ताने तेथील सरकार कोसळलं आहे. सोशल मीडिया बंदीनंतर नेपाळमध्ये जनक्षोभ उसळला असून आंदोलकांनी संसंदेत आक्रमण करत जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या शेजारील देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होतो तेव्हा त्याची तीव्रता अप्रत्यक्षपणे भारतापर्यंत जाणवते. दरम्यान, नेपाळ आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध नेमके कसे आहेत. या दोन्ही देशात किती व्यापार होतो? याबाबतची माहिती पाहुयात.

दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे व्यापारी संबंध

भारत आणि नेपाळमध्ये एकूण 8 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. दशकापूर्वी नेपाळ भारताचा 28 वा व्यापारी भागीदार होता, परंतु आता तो 14 व्या स्थानावर आला आहे. 2024-25  या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 8.5 अब्ज डॉलर्स होता. यामध्ये भारताने 7.33 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, तर नेपाळने 1.20 अब्ज डॉलर्सची निर्यात केली. भारतातून नेपाळला होणारी निर्यात नेपाळच्या एकूण जीडीपीच्या सुमारे 16 टक्के इतकी आहे.

श्रीलंका आणि बांगलादेशच्या तुलनेत नेपाळचे महत्त्व भारतासाठी वेगळे

प्रथम श्रीलंका, नंतर बांगलादेश आणि आता नेपाळ. भारताच्या शेजारील देशांमध्ये गंभीर पपस्थिती उद्भवत आहे. त्यामुळं भारत सरकारला सावध राहण्यास भाग पाडले आहे. पण, याचा दुसरा पैलू असा आहे की श्रीलंका आणि बांगलादेशच्या तुलनेत नेपाळचे महत्त्व भारतासाठी नेहमीच वेगळे राहिले आहे. नेहमीच स्वतंत्र राहिलेला हा छोटासा हिंदू देश आता राजकीयदृष्ट्या खूप अस्थिर झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला आहे, तर निदर्शकांनी सर्वोच्च न्यायालयात आग लावली आहे.

नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?

नेपाळमधील घराणेशाही आणि भ्रष्टाचारामुळं हा राग उफाळला आहे. पण व्यापाराच्या बाबतीत पाहिले तर नेपाळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे नेपाळच्या सीमेला लागून आहेत. दोन्ही देशांमध्ये रोटी-बेटीचे नाते देखील निर्माण झाले आहे. हा छोटासा देश भारताचा चौदावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतातून नेपाळला 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू निर्यात केल्या जातात, तर नेपाळ भारतात सुमारे 1 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात करतो.

आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवलं

नेपाळमध्ये सोशल मिडिया (Nepal Social Media Ban) बंदी विरोधात GenZ नं केलेल्या आंदोलनामुळं देशातील सत्तेला हादरे बसले आहेत. नेपाळच्या पंतप्रधांनाना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं GenZ नं कालपासून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवलं आहे.सेना आणि पोलिसांच्या हातातून आंदोलकांनी शस्त्र हिसकावून घेतली आहेत. नेपाळमध्ये GenZ आंदोलन करत असले तरी हे आंदोलन दोन मिलेनियलनं भडकावलं आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह (Balendra Shah) आणि सुदन गुरुंग (Sudan Gurung) या दोन्ही मिलेयनियलनी आंदोलन भडकेल अशा पद्धतीनं पोस्ट केल्या.

महत्वाच्या बातम्या:

नेपपल जीन-झोरी स्टोट: बालेक दोन मैल, सुदान गुरुनियल्स, दोन्ही गेन्झ लंगेट्ससह

आणखी वाचा

Comments are closed.