भारताकडून अमेरिकेला जीरो टॅरिफ ट्रेड करार संदर्भात ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, म्हण

भारत यूएस दर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत आपली महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांनी आता आणखी एक दावा केला आहे. ते म्हणाले की, भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची (Zero Tariff Trade Deal) ऑफर दिली आहे. अमेरिकेने यापूर्वी भारतावर 26 टक्के कर लादला होता. यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता ट्रम्प यांनी एक पुन्हा एक धक्कादायक दावा केला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, “भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची ऑफर दिली आहे. भारतात काहीही विकणे खूप कठीण आहे, परंतु ते वॉशिंग्टनसोबत शून्य शुल्क व्यापार करार करण्यास तयार आहेत.” डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 एप्रिल रोजी लिबरेशन डे (Liberation Day) निमित्य भारतासह अनेक देशांवर शुल्क जाहीर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, भारताने अमेरिकेशी व्यापार कराराबाबत चर्चा तीव्र केली होती.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर ट्रम्प काय म्हणाले?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आक्रमक भूमिका स्वीकारली. त्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. भारतानेही ड्रोनने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबतच्या चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा ट्रम्प यांनी जगासमोर केला.

ट्रम्प यांनी कोणत्या देशावर किती शुल्क लादलंय?

अमेरिकेने चीनवर 145 टक्के कर लादला आहे. तर व्हिएतनामवर 46 टक्के शुल्क लादण्यात आले आहे. तसेच व्हिएतनामला 90 दिवसांची सूट दिली आहे. त्यामुळे सध्या हा कर फक्त 10 टक्के आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडवर फक्त 10 टक्के कर कायम ठेवला आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानं नवी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि अमेरिकेत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. टॅरिफ शुल्काबाबत अमेरिकेने चीनला झुकतं माप देत 145 टक्क्यांवरून  चीनी उत्पादनांवरचं शुल्क 35 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार कराराला उशीर होत आहे. अमेरिकेसोबत व्यापारी करार करणारा भारत पहिला देश ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, अमेरिका आणि चीन यांनी टॅरिफ वॉरवरुन सुरु झालेला संघर्ष थांबवण्याची घोषणा केली. यामुळं दोन्ही देशांकडून टॅरिफ कमी करण्यावर सहमती दर्शवण्यात आली. आता भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेकडे जात आहे.

हेही वाचा:

US China Trade Deal : अमेरिका आणि चीनचे सूर जुळण्याची शक्यता, टॅरिफ घटवलं, भारताच्या कंपन्यांवर ट्रम्प यांचं सावट?

अधिक पाहा..

Comments are closed.