भारताच्या एका निर्णयानं चीनचे सर्व अंदाज फसले, चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये खळबळ,मोठं नुकसान

<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत ते उद्धवस्त केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर ड्रोन पाठवून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतानं ते हल्ले परतवून लावले, याशिवाय पाकिस्तानच्या काही लष्करी तळांवर देखील हल्ले केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढत होता याचा सर्वाधिक फायदा चीनला मिळाला होता. चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये भारत आणि पाकिस्तान वादामुळं शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी आली होती.मात्र, त्यानंतर त्यामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.  

युद्धाच्या शक्यतेनं चीन शेअर बाजारात तेजी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरु असताना गुंतवणूकदारांनी अंदाज लावला की चीन पाकिस्तानला अधिक शस्त्र पुरवठा करेल. यामुळं गुंतवणूकदारांनी चीन मधील शस्त्र निर्मिती कंपन्यांच्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली. 8 मे रोजी AVIC या चेंगदू एअरक्राफ्टे शेअर 16 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीकडून चीनला पाकिस्तानला J-10 C फायटर जेटचा पुरवठा केला जातो. तर, AVIC एअरोस्पेसचे शेअर 6 टक्क्यांनी वाढले होते. लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर या कंपनीकडून बनवले जातात. चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनचे शेअर देखील वाढले होते. पाकिस्तानच्या नौदलाला लढाऊ नौका चीनच्या या कंपनीकडून पुरवले जातात.  

शस्त्रसंधी आणि चीनच्या संरक्षण कंपन्यांचे शेअर घसरले

10 मे  रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर करावी यासाठी मध्यस्थी केल्याचं जाहीर केलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होताच चीनच्या या कंपन्यांचे स्टॉक्स गडगडले.  AVIC चेंगदू एयरक्राफ्ट हा शेअर 7.4 टक्क्यांनी घसरला. चाइना स्टेट शिपबिल्डिंगचा स्टॉक 4 टक्क्यांनी घसरला. Zhuzhou Hongda Electronics चा शेअर 6.34 टक्क्यांनी घसरला.  

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून चीनकडून शस्त्र खरेदी करत आहे. एसआयपीआरआयच्या आकडेवारीनुसार 2019-2023 दरम्यान पाकिस्ताननं चीनकडून 5.28 अब्ज डॉलर्सची शस्त्र खरेदी केली. पाकिस्तानच्या एकूण आयातीपैकी 81 टक्के आयात चीनकडून होते. चीननं पाकिस्तानला  JF-17 थंडर जेट, SH-15 आर्टिलरी गन आणि नौसैनिक जहाज दिलेत.

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC) अंतर्गत चीन पाकिस्तानमध्ये 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पात चीन चे कर्मचा आणि संपत्तीची सुरक्षेचा समावेश आहे. ज्यामुळं पाकिस्तानला शस्त्र आवश्यक आहेत.  

संरक्षण कंपन्यांना धक्का

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव कायम राहिला असता तर चीनकडून पाकिस्तानला निर्यात वाढली असती. शस्त्रसंधी झाल्यामुळं चीनच्या शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.  

Comments are closed.