IND vs ENG: भारत की इंग्लंड? सेमीफायनलच्या हायव्होल्टेज लढतीत कोण बाजी मारणार? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

क्रिकेट प्रेमींच्या प्रतीक्षेचा क्षण संपला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी जे विधान केले आहे, ते अत्यंत थक्क करणारे आहे. आजच्या (5 मार्च 2026) सामन्यासाठी त्यांनी भारताला नव्हे, तर इंग्लंडच्या संघाला आपला ‘फेव्हरेट’ संघ मानले आहे.
सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ते म्हणाले की, अजून एकही चेंडू टाकला गेला नाहीये, पण तरीही मला वाटते की इंग्लंडचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यांचे जिंकण्याचे चान्सेस भारतापेक्षा जास्त आहेत. सुनील गावस्कर यांचे हे विधान चुकीचेही वाटत नाही, कारण चालू स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडच्या संघाने टीम इंडियापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ‘सुपर-8’ फेरीमध्ये टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहून सेमीफायनलसाठी पात्र ठरली होती. याउलट, इंग्लंडचा संघ आपल्या ग्रुपमध्ये अव्वल (Top) स्थानावर राहून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
पण आता सेमीफायनलमध्ये टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहून टीम इंडियाचं पारडं देखील जड वाटत आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) अर्धशतक करून नाबाद खेळत आहे तर, ईशान किशन 39 धावा करून बाद झाला आहे.
Comments are closed.