Ind vs NZ: दुसऱ्या वनडेनंतर भारत की न्यूझीलंड? पाहा कोणाचे पारडे आहे जड!

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील शेवटचा सामना (18 जानेवारी) रोजी खेळला जाईल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांपैकी भारताने पहिला सामना जिंकला होता, तर न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांमधील हेड-टू-हेड आकडेवारी कशी आहे, यावर एक नजर टाकूया.

आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 121 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 63 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामन्यांत बाजी मारली आहे. एक सामना ‘टाय’ झाला आहे, तर 7 सामन्यांचा कोणताही निकाल लागलेला नाही. हेड-टू-हेड आकडेवारी पाहता भारताचे पारडे अधिक जड असल्याचे दिसून येते.

भारताची संभाव्य प्लेइंग 11:
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा किंवा अर्शदीप सिंग.

Comments are closed.