देशहित सर्वोपरी! पाकिस्तान सोबत व्यापार पूर्णत: बंद; व्यापाऱ्यांच्या CAIT संघटनेचा मोठा निर्णय
भारत पाक युद्ध: कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅट (CAIT) ने पाकिस्तान सोबत तातडीने व्यापार (No Trade with Pakistan) थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार सह आता भारतीय व्यापारी ही पाकिस्तानची कोंडी करण्याच्या प्रक्रियेत सक्रीय झाले आहे. देशहित सर्वोपरी असून व्यापाराचे हित त्यानंतर येतं, असे सांगत कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया यांनी पाकिस्तान सोबत आमचे सर्व सदस्य व्यापार थांबवत असल्याचे जाहीर केलं आहे. कॅटच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे पार पडली, त्यात हा निर्णय सर्वानुमते घेतल्याचा दावा बी सी भरतीया यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या असल्याचे पुढे आले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी पाकिस्तान सोबतचे व्यापार थांबविल्यामुळे पाकिस्तान (Pakistan)ला साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाइल्स पार्ट, टायर ट्यूब अशा वस्तूसाठी पाकिस्तानी व्यापारी आणि नागरिक तरसतील, असे भरतीया म्हणाले. दरम्यान भारताला ही पाकिस्तानमधून येणाऱ्या सुक्या मेव्याला मुकावे लागेल, मात्र आम्ही त्याविना राहू असे ही भरतीया म्हणाले. जोवर पाकिस्तानी व्यापारी आणि ग्राहक आपल्या सरकारवर दबाव आणून दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी सांगत नाही, तोवर आम्ही पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही, असे ही कॅटने जाहीर केले आहे. (No Trade with Pakistan)
चिल्लर व्यापाऱ्यांची संख्या तब्बल 9 कोटी
दरम्यान, इथून पुढे पाकिस्तानसोबत व्यापार करणार नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांच्या सर्वात मोठं संघटन असलेल्या CAIT ने घेतला आहे. यात देशभरात कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT) सोबत जोडलेल्या छोट्या व्यापारी संघटनांची संख्या 40 हजार इतकी आहे. तर CAIT सोबत जोडलेल्या चिल्लर व्यापाऱ्यांची संख्या तब्बल 9 कोटी इतकी आहे. पाकिस्तान सोबत व्यापार थांबवल्यामुळे पाकिस्तानला साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाईल पार्ट्स, रबरी टायर ट्यूब याला मुकावे लागेल. तर भारताला सुकामेवा मिळणार नाही. ॲडव्हान्स म्हणून दिलेले काही कोटी रुपये मोडतील, मात्र आमची त्यासाठीची तयारी असल्याचे CAIT चे म्हणणे आहे.
पर्यटकांना पून्हा आकर्षित करण्यासाठी श्रीनगरच्या फळ विक्रेत्यांचे मोठं पाऊल
पर्यटकांना पून्हा आकर्षित करण्यासाठी श्रीनगरच्या ‘डल लेक’ मधील छोटे फळ विक्रेते पर्यटकाना मोफत फ्रूट देत आहे. पेहलगामच्या घटनेमुळे व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. इथे पर्यटक आले पाहिजे. त्यासाठी सध्या होत असलेले नुकसानही स्विकारायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्या फळ विक्रेत्याने दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.