‘मला वाटतं की’, भारत-पाक सामन्यात हा संघ जिंकेल! वसीम अक्रम यांची मोठी भविष्यवाणी

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan in Asia Cup 2025) यांच्यात 14 सप्टेंबरला दुबई येथे सामना होणार आहे. सुपर फोर टप्प्यात 21 सप्टेंबरला दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Vasim Akram) यांनी भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना कठोर मेहनत आणि आक्रमकपणे खेळा, पण अनुशासनाची मर्यादा ओलांडू नका, असा सल्ला दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही चिरप्रतिद्वंद्वी पुढच्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत (UAE) होणाऱ्या आशिया कपमध्ये पुन्हा भिडणार आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे हा सामना अधिकच खास ठरणार आहे.

पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अकरम यांनी Telecom Asia Sport शी बोलताना सांगितले, मला खात्री आहे की हा सामना देखील इतर भारत-पाक सामन्यांप्रमाणेच रोमांचक होईल. पण माझी अपेक्षा आहे की खेळाडू आणि चाहते दोघांनीही संयम राखावा आणि शिस्तीच्या मर्यादा ओलांडू नयेत.

ते पुढे म्हणाले, भारतीय चाहते आपल्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करतात, तसेच पाकिस्तानी चाहत्यांनाही आपल्या संघाची जिंकण्याची तितकीच इच्छा आहे. सध्या भारत उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल. मात्र, त्या दिवशी दबाव कोणता संघ चांगल्या पद्धतीने सांभाळतो, त्यावर निकाल अवलंबून असेल.

अकरम यांनी हेही स्पष्ट केले की, पाकिस्तानची युवा टीम भारताला हरवण्यासाठी भुकेली आहे. पण स्टार फलंदाज बाबर आझमचा संघात समावेश न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अकरम म्हणाले, वैयक्तिकदृष्ट्या मला बाबर आझम संघात असावा असं वाटत होतं. पण आता जे खेळाडू संघात आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे की त्यांनी पुढे येऊन चांगली कामगिरी करावी.

अकरम यांचे मत आहे की, या स्पर्धेत भारत-पाक यांच्यात किमान तीन सामने होऊ शकतात, ज्यात एक संभाव्य अंतिम सामना देखील असू शकतो. ते म्हणाले,
हा आशिया कप जगभरातील चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल. माझी इच्छा आहे की भारत-पाकिस्तान कसोटी मालिका पुन्हा सुरू व्हावी. खूप काळ झाला आहे आणि ती मालिका दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी ऐतिहासिक क्षण ठरेल.

Comments are closed.