देशात अन्नधान्याचा साठा मुबलक, काळजी करण्याची गरज नाही, सरकारचं देशवासियांना आश्वासन

भारत पाकिस्तान युद्ध: भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan war) सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावण्यात भारतीय सैन्य दलाला यश आलं आहे. भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. दरम्यान, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं एक पत्र जारी केलं आहे. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात तांदूळ, गहू, डाळी, फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत. देशभरात शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी सुरळीत सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीत, कोणत्याही नागरिकाने देशाच्या अन्न सुरक्षेची काळजी करण्याची गरज नसल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. लोकांना अन्न उपलब्धतेबद्दल काळजी करु नये असे आवाहन त्यांनी केलं आहे. देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे मंत्रालयानं सांगितले आहे. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात तांदूळ, गहू, डाळी, फळे आणि भाज्या उपलब्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

नागरिकांनी देशाच्या अन्न सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने शनिवारी देशभरातील नागरिकांना आश्वासन देणारे पत्र जारी केले. मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही नागरिकाने देशाच्या अन्न सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. धान्ये, डाळी आणि फळे पुरेशा प्रमाणात आहेत. पत्रात, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की आमच्याकडे पुरेशा प्रमाणात भात, गहू, डाळी, फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत. देशभरात शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी सुरळीत सुरु आहे आणि धान्यांपासून ते बागायतीपर्यंत सर्व क्षेत्रात उत्पादन लक्ष्यापेक्षा जास्त आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि प्रशासन हे तिघेही एकत्र आहेत. तसेच, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आमची तयारी पूर्ण झाल्याचे आश्वासन दिले आहे.

आमच्याकडे पुरेशा प्रमाणात साठा

केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही, देशभरात पुरेसा साठा उपलब्ध आहे. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की सध्या आपल्याकडे सामान्य गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त साठा उपलब्ध आहे. मग ते तांदूळ असो, गहू असो किंवा हरभरा, तूर, मसूर किंवा मूग यासारख्या डाळी असोत. कोणतीही कमतरता नाही आणि नागरिकांना अन्नधान्य खरेदी करण्यासाठी घाबरू नका किंवा बाजारात गर्दी करू नका असा सल्ला देण्यात येत आहे.

साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार

आपल्याकडे आवश्यक असलेल्या मानकांपेक्षा खूप जास्त अन्नसाठा आहे. खोट्या संदेशांकडे दुर्लक्ष करा. आवश्यक वस्तूंच्या व्यापारात सहभागी असलेले व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते किंवा व्यावसायिक संस्थांना कायदा अंमलबजावणी संस्थांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. साठेबाजी किंवा साठा करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर आवश्यक वस्तू कायद्याच्या संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

इडिया पाकिस्तांतन वर: भारताने ग्रह बदलले आहेत, आता आता मिशनरी डेड सुरू होत आहे, पाकिस्तान आपले आहे, आता आपण आता शांततापूर्ण हवी आहोत!

अधिक पाहा..

Comments are closed.