मोफत वाय-फाय, कॅफेटेरिया आणि संगीत…आयआयटीमध्ये मुंबईतील  पहिले जेन झी पोस्ट ऑफिस

युवा पिढीशी कनेक्ट होणारे मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी पवई येथे सुरू होत आहे. गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे उद्घाटन होईल.  या पोस्ट ऑफिसमध्ये मोफत वाय-फाय, कॅफेटेरिया, संगीत, टपाल तिकीट संग्रहाशी संबंधित पूरक गोष्टी असे बरेच काही असेल.

भारतीय टपाल विभागाने युवा, विद्यार्थी आणि डिजिटल जमान्यातील लोकांसाठी जेन झी पोस्ट ऑफिस साकारली आहेत. दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशी पोस्ट ऑफिसेस सुरू झाली आहेत. आता त्यामध्ये मुंबईचीही भर पडणार आहे. उद्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह आणि मुंबई विभागाचे  टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते, आयआयटी मुंबईच्या कुलसचिवांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल.

जेन झी टपाल कार्यालयाची प्रमुख वैशिष्टय़े

मोफत वाय-फाय सुविधा असलेली जागा n कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था आणि छोटे वाचनालय

समर्पित संगीत कक्ष n टपाल तिकीट संग्रहाशी संबंधित पूरक वस्तू n पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पार्सल ज्ञान पोस्ट’ n पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण

आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा n टपाल कार्यालय बचत बँक (पीओएसबी) योजनेचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन n

विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीः स्पीड पोस्ट सेवांवर दहा टक्के  सवलत

Comments are closed.