भारताचा अमेरिकेविरोधात एक निर्णय, WTO धावकडे धाव घेताच स्टील कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात आज (14 मे 2025) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आहे. स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमशी संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये बाजार सुरु झाला तेव्हा जोरदार तेजी पाहायला मिळाली. जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली.

शेअर बाजार सुरु झाला तेव्हा टाटा स्टीलच्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग 151 रुपयांना सुरु झालं. टाटा स्टीलच्या स्टॉक 157.15 रुपयांपर्यंत पोहोचला. बाजार बंद झाला तेव्हा स्टॉक 155.31 रुपयांवर होता. नाल्कोच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. एनएमडीसी,  हिंदूस्थान झिंक, वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये देखील 2 ते 3 टक्के तेजी दिसून आली. हिंदूस्तान कॉपर, जिंदल स्टेनलेस, सेंच्युरी एक्सट्रुशन, ग्रेविटा इंडियाच्या स्टॉकमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली.

भारतानं जागतिक व्यापार संघटनेत धाव घेत एक प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेनं स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं याचं प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतून आयात  होणाऱ्या काही वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतानं जागतिक व्यापार संघटनेत बाजू मांडताना म्हटलं की टॅरिफमुळं झालेल्या व्यापाराच्या नुकसानामुळं प्रत्युत्तरासाठी टॅरिफ लादण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. त्यामुळं भारत अमेरिकेच्या काही वस्तूंवर टॅरिफ लादू शकतो.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, भारतानं जागतिक व्यापार संघटनेला म्हटलं की स्टील उत्पादनं आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या आयातीवर अमेरिकेकडून काही निर्णय घेण्यात आलेत, मात्र ते डब्ल्यूटीओला कळवले नसल्याचं महटलं. भारताकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमची निर्यात केली जाते.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतानं अमेरिकेला 4 अब्ज डॉलर्सच्या स्टीलची आणि 1.1 अब्ज डॉलर्सच्या अ‍ॅल्युमिनिअमची निर्यात केली होती. जानेवारी 2024 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देश 336000 टन स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या आयात निर्यातीवर सहमती दर्शवली होती.  आता जर अमेरिका  प्रत्येक देशातून आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमवर 25 टक्के टॅरिफ लादणार असेल तर भारताला नुकसान होऊ शकतं. यामुळं भारतानं मोठी तयारी केली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.