केस धरुन ओढलं, फटाफटा तोंडावर अन् कानाखाली मारल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांसोबत नेमकं काय अन् कसं घडलं?

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान झालेल्याहल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या तपासानुसार हल्ला करणारा व्यक्ती राजेश भाई सकरिया असून तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे.

दिल्लीतील जनसुनावणी दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला. एक व्यक्ती त्यांच्याकडे येऊन कागदपत्रं ठेवताच अचानक त्यांच्या हाताला धरून केस ओढले, कानाखाली व तोंडावर थपडा मारल्या आणि ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्यांचं डोकं टेबलाच्या कोपऱ्यावर आदळलं.

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान घडलेल्या घटनेचा भाजप तीव्र निषेध करते. पोलिस तपासात हे प्रकरण उघड होईल.

वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, एखाद्या महिलेसोबत कोणी असे कसे करू शकते याचे त्यांना आश्चर्य वाटते. विशेषतः जेव्हा ती मुख्यमंत्री असते आणि दिवसाचे 18 तास काम करत असते. त्या पुरूषाला पकडण्यात आले आहे, जे काही घडले ते दुर्दैवी आहे. डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. राजकारणात हिंसाचाराला स्थान नाही.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव म्हणाले की, हे खूप दुःखद आहे. मुख्यमंत्री संपूर्ण दिल्लीचे नेतृत्व करतात आणि मला वाटते की अशा घटनांचा निषेध करणे पुरेसे नाही परंतु ही घटना महिलांच्या सुरक्षेचे वास्तव देखील उघड करते. जर दिल्लीचे मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणूस किंवा सामान्य महिला कशी सुरक्षित राहू शकेल?

दिल्ली कॅबिनेटचे मंत्री मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. रेखा गुप्ता यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत.

येथे प्रकाशितः 20 ऑगस्ट 2025 11:24 एएम (आयएसटी)

भारत फोटो गॅलरी

आणखी पाहा

Comments are closed.