महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?

CPI महागाई नवी दिल्ली : भारतात रिटेल महागाई फेब्रुवारी 2026 वाढून 3.21 टक्क्यांवर पोहोचली आहे.जानेवारी 2026 मध्ये ही आकडेवारी 2.74 टक्क्यांच्या तुलनेत 47 बेसिस पॉईंटनं अधिक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच एनएसओनं सध्या दिलेल्या कंझ्यूमर प्राइस इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीत माहिती दिली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात महागाईचा दर वेगवेगळा आहे.ग्रामीण भागात महागाई 3.37 टक्के असून सहरी भागात महागाई 3.02 टक्के आहे.

खाद्यपदार्थांच्या महागाईची मोजणी करणाऱ्या कंझ्युमर फूड प्राईस फेब्रुवारी 2026 मध्ये महागाई 3.47 टक्के झाली आहे. ग्रामीण भागातील महागाई 3.46 टक्के झाली आहे. तर शहरी भागातील महागाई 3.48 महागाई आहे.

आकडेवारीनुसार फेब्रुवारीत काही भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो, वाटाणा, कोबीच्या निर्देशांकात जानेवारीच्या तुलनेत 10 टक्के घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात महागाई कमी राहिली त्यात लसूण, कांदा आणि बटाटा यासारख्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. लसणाच्या दरात वार्षिक आधारावर 31.09 टक्के घसरण झाली. तर, कांद्याच्या दरात वार्षिक आधारावर 28.20 टक्के घसरण झाली. तर, बटाट्याच्या दरात वार्षिक आधारावर 18.46 टक्के घसरण झाली.

दुसरीकडे काही वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली.  सर्वाधिक महागाई चांदीच्या दागिन्यांमध्ये दिसून आली. वार्षिक आधारावर किंमत 160.84 टक्क्यांनी वाढली आहे. सोने, हिरे, आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची महागाई 48.16 टक्के राहिली आहे. खोबऱ्याचे दर 46.16 टक्क्यांनी, टोमॅटोचे दर 45.29 टक्के आणि फ्लॉवरच्या दरात 43.77 टक्के महागाई दिसून आली.

सीपीआयच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. फेब्रुवारीत फूड अँड बेवरेजेज कॅटेगरीत महागाई 3.35 टक्के राहिली. तंबाखूजन्य पदार्थांची महागाई 3.49 टक्के, कपडे आणि फूटवेअरमध्ये महागाई 2.81 टक्के, हाऊसिंग पाणी, वीज गॅस आणि इतर इंधन यासारख्या कॅटेगरीत महागाई 1.52 टक्क्यांनी वाढली. ट्रान्सपोर्ट कॅटेगरीत महागाई कमी झाली. शैक्षणिक सेवांमध्ये महागाई 3.33 टक्के राहिली. रेस्टॉरंट आणि हटेल सेवांमध्ये महागाई 2.73 टक्के होती.

सरकारनं माहिती देताना म्हटलं की फेब्रुवारी 2026 चे आकडे तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. मार्च 2026 च्या महागाईचे आकडे  13 एप्रिल 2026 ला जारी केले जातील.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.