अंतराळातही भारत-रशियाची मैत्री

दोन्ही देशांची नवीन अंतराळ स्थानके एकाच कक्षेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (आयएसएस) सध्याचा प्रवास 2030-31 पर्यंत संपणार आहे. त्यानंतर, रशिया आणि भारताने आपापली भविष्यातील अंतराळ स्थानके एकाच कक्षेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री बाकानोव्ह यांनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान ही घोषणा केली. दोन्ही स्थानके 51.6 अंशाच्या कक्षेत फिरणार असून दोन्ही देशांतील अंतराळवीरांना एकमेकांच्या स्थानकांना सहजपणे भेट देता येईल तसेच वैज्ञानिक प्रयोग करता येतील आणि आपत्कालीन मदत घेता येईल, असे सांगण्यात आले. अंतराळ स्थानकांच्या बाबतीत घेण्यात आलेला हा निर्णय दोन्ही देशांसाठी परस्पर फायदेशीर ठरेल, असे बाकानोव्ह यांनी सांगितले.

Comments are closed.