भारतावर टीका करणाऱ्यांचाच रशियासोबत व्यापार, ट्रम्प यांच्या धमकीवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर
व्यवसाय बातम्या: रशिया-युक्रेन युद्धानंतर, जेव्हा जगभरात ऊर्जा संकट अधिकच गडद झाले, तेव्हा भारताने स्वस्त आणि स्थिर ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रशियाकडून तेल आयात वाढवली. यावरुन अमेरिका आणि युरोपियन युनियनने भारतावर टीका केली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अमेरिका देश हाच रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार करत आहे. जोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर परराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड उत्तर दिलं आहे.
अमेरिका आणि युरोपचे दुटप्पी धोरण
अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडून भारताच्या तेल आयातीबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु सत्य हे आहे की रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोपने पारंपारिक पुरवठादारांकडून तेल मिळणे बंद केले आणि भारताला ते तेल मिळू लागले. या परिस्थितीत, जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राखण्यासाठी अमेरिकेनेच भारताला असे तेल आयात करण्यास प्रोत्साहित केले.
तेल आयात करणे ही भारताची सक्ती नाही तर गरज
भारताचा निर्णय पूर्णपणे ग्राहकांना स्वस्त आणि विश्वासार्ह ऊर्जा सुनिश्चित करण्याच्या गरजेने प्रेरित होता. ही राजकीय चाल नव्हती, तर जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे उद्भवलेली सक्ती होती. त्याच वेळी, भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियासोबत व्यवसाय करत आहेत.
युरोपचा रशियासोबत मोठ्या प्रमाणात व्यापार
2024 मध्ये युरोपियन युनियन आणि रशियामधील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 67.5 अब्ज युरोपर्यंत पोहोचला. याशिवाय, 2023 मध्ये सेवांचा व्यापार 17.2 अब्ज युरो इतका अंदाजे होता. हा भारत-रशिया व्यापारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. 2024 मध्ये, युरोपने रशियाकडून 16.5 दशलक्ष टन एलएनजी आयात केली, जी 2022 च्या 15.21 दशलक्ष टनांच्या मागील विक्रमापेक्षा जास्त आहे. ऊर्जेव्यतिरिक्त, युरोपियन व्यापारात खते, खाण उत्पादने, रसायने, लोखंड-पोलाद आणि यंत्रसामग्री यांचाही समावेश आहे.
अमेरिका देखील मागे नाही
अमेरिका रशियासोबत सतत व्यापार करत आहे. ते आपल्या अणुउद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने आयात करत आहे. अशा परिस्थितीत, भारताला लक्ष्य करणे केवळ अन्याय नाही तर ढोंगीपणा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्गहटलं आहे. भारत आपल्या हितांशी तडजोड करणार नाही. भारत एक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आपल्या राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलेल. भारताला लक्ष्य करणाऱ्या देशांनी प्रथम त्यांच्या स्वतःच्या धोरणांचा आढावा घ्यावा असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
पुन्हा एकदा भारतावर कर वाढवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर कर वाढवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करुन मोठ्या नफ्यावर कमावत असल्याचा आरोप केला आहे. भारत केवळ रशियाकडून तेल खरेदी करत नाही तर खुल्या बाजारात ते विकून मोठा नफा मिळवत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Donald Trump : रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
आणखी वाचा
Comments are closed.