हिंदी चित्रपट ‘होमबाऊंड’ ‘ऑस्कर’च्या शर्यतीत

जागतिक सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया ऑस्कर-2026साठी हिंदुस्थानातून ‘होमबाऊंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात येणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून ‘होमबाऊंड’चे नाव आज घोषित केले. देशभरातील विविध भाषांतील 24 चित्रपट या शर्यतीत होते.
नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ चित्रपट येत्या 26 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे. ‘होमबाऊंड’मध्ये विशाल जेठवा, इशान खट्टर, जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत. नुकतेच चित्रपटाने टोरँटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पीपल्स चॉईस ऍवॉर्डचे उपविजेतेपद मिळवले.
16 डिसेंबर 2025 रोजी ऑस्कर अॅकॅडमी निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांना ‘शॉर्टलिस्ट’ करेल. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी अंतिम पाच नामांकित चित्रपटांची नावे जाहीर केली जातील. 98वा ऑस्कर सोहळा 15 मार्च 2026 रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रंगेल.
n ‘होमबाऊंड’ हा चित्रपट म्हणजे चंदन कुमार आणि मोहम्मद शोएब अली या दोन तरुणांच्या स्वप्नांची आणि संघर्षाची कथा आहे. त्यांच्या स्वप्नांच्या मार्गात येणाऱया अडचणी, त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद चित्रपटात दाखवली आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘होमबाऊंड’ दाखवण्यात आला. टोरँटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला स्टँडिंग ओविएशन मिळाले.
Comments are closed.