न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! 4 वर्षानंतर या खेळाडूचं पुनरागमन

बीसीसीआयने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. (Team india vs Newzealand) भुवनेश्वर कुमारचे (Bhuvneshwar Kumar) तब्बल 4 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. आता पुन्हा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.

मंगळवारी गुवाहाटी येथील ACA स्टेडियममध्ये (BCCI) बीसीसीआयची बैठक झाली. याच बैठकीत संघाची निवड करण्यात आली. या बैठकीला अंतरिम मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा, आरपी सिंग, शिवसुंदर दास, अजय रात्रा आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) उपस्थित होते. याच बैठकीत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया A संघाचीही निवड करण्यात आली. इंडिया A संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर तीन बहुदिवसीय सामने खेळायचे आहेत. ही मालिका 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव

भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा 40 दिवसांचा असेल. हा दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेने होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीचेही (Varun Chakrawarthy) पुनरागमन होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता.

भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक

22 ऑक्टोबर — पहिला टी-20 सामना — क्राइस्टचर्च

24 ऑक्टोबर — दुसरा टी-20 सामना — क्राइस्टचर्च

27 ऑक्टोबर — तिसरा टी-20 सामना — वेलिंग्टन

30 ऑक्टोबर — चौथा टी-20 सामना — ऑकलंड

1 नोव्हेंबर — पाचवा टी-20 सामना — हॅमिल्टन

Comments are closed.