कसोटी कर्णधार गिल बाहेर, तर रोहित-विराटची एन्ट्री? वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा


ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी इंडिया एकदिवसीय संघ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड लवकरच होणार असून चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे. या दोघांनी भारतासाठी शेवटचे सामने यंदाच्या मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळले होते. पीटीआयच्या माहितीनुसार, निवड समिती वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीदरम्यान वनडे संघाची निवड करणार आहे, मात्र, अधिकृत घोषणा कसोटीनंतर केली जाईल. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे अनुपलब्ध आहेत. तर आशिया कप आणि त्यानंतर झालेल्या कसोटी मालिकेत सलग खेळलेल्या कर्णधार शुभमन गिलला आराम दिला जाऊ शकतो.

गिलला विश्रांती मिळाली तर ओपनिंग कोण करणार?

जर गिलला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली, तर रोहितच्या जोडीला अभिषेक शर्मा किंवा यशस्वी जैस्वाल या दोन डावखुऱ्या फलंदाजांपैकी एकाची निवड होऊ शकते. याच कारणामुळे अभिषेकला ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या दोन लिस्ट ए सामन्यांमध्ये खेळवण्यात आले होते. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला असला तरी त्याची डावखुरी फिरकी आणि अलीकडील फॉर्म पाहिला तर तो चांगला पर्याय ठरतो.

रोहित-कोहलीच्या भवितव्यावर चर्चा

रोहित आणि कोहली यांनी मार्चनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर रोहितने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध जिंकवून देणारी खेळी केली होती. वनडे विश्वचषक 2027 लक्षात घेऊन या दोघांच्या भविष्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण नाही, मात्र तो स्वतः फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडायचे ठरवला तर गोष्ट वेगळी आहे.

बीसीसीआय सूत्रांनुसार, या हंगामात भारत फक्त सहा वनडे सामने खेळणार आहे, तीन ऑस्ट्रेलियात आणि तीन न्यूझीलंडविरुद्ध भारतात आहेत. त्यामुळे घाईगडबडीत मोठे निर्णय घेतले जाणार नाहीत. सध्या प्राथमिकता म्हणजे 2026 मध्ये भारतात होणारा टी20 वर्ल्ड कप आणि 2025 मधील घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांमधून जास्तीत जास्त गुण मिळवून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आघाडी घेणे आहे.

बुमराहच्या कार्यभारावर निर्णय

वनडे मालिकेसाठी जिओ हॉटस्टारच्या प्रोमोमध्ये रोहित-कोहलीचे फोटो झळकले असून त्यातून त्यांचा समावेश निश्चित असल्याचे संकेत मिळतात. जसप्रीत बुमराहबाबत बोलायचे झाले तर, त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोट्यांसाठी गरज भासणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज कसोटी टाळून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांनी सांगितले होते की, बुमराह स्वतः दोन्ही कसोट्या खेळू इच्छित आहे.

आशिया कप आणि दोन कसोट्यांनंतर पुढची कसोटी मालिका तीन आठवड्यांवर आहे. त्यानंतर लगेच टी-20 विश्वचषकापूर्वी टी20 मालिका होईल. त्यामुळे बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ब्रेक देण्याचा विचार केला जाऊ शकतो. हार्दिक पांड्या फिट होण्याची शक्यता कमी असल्याने नीतीश रेड्डीला संधी मिळू शकते. दुसरा पर्याय शिवम दुबे आहे, मात्र ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत त्याने कधी गोलंदाजी केली नाही.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक (India Australia Tour Schedule)

वनडे मालिकेचं वेळापत्रक

19 ऑक्टोबर – पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)

पाच सामन्यांची टी 20 मालिका

29 ऑक्टोबर – पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर – दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर – तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर – चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर – पाचवी टी20 (ब्रिसबेन)

आणखी वाचा

Comments are closed.