IND vs WI Test Series – टीम इंडियाची घोषणा; करुण नायरचा पत्ता कट, उपकर्णधारही बदलला

आशिया कप संपल्यानंतर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तत्पूर्वी बीसीसीआयने हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली. शुभमन गिल याच्याकडे कर्णधार, तर रविंद्र जडेजा याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हिंदुस्थानचा संघ –
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
🚨 सादर करणे #Teamindiaवेस्ट इंडीज चाचणी मालिकेसाठी पथक 🔽#Indvwi | @Idfcfirstbank pic.twitter.com/s4d5mdgjnn
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 25 सप्टेंबर, 2025
Comments are closed.