ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली
भारत कसोटी संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2025: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे (Ruturaj Gaikwad) पुनरागमन झाले आहे. त्याची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचं नेतृत्व करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड नेतृत्व करणार आहे.
अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांना देखील संघात स्थान मिळाले आहे. यष्टीरक्षक म्हणून इशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णाचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात कोणा-कोणाला संधी?
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विप्रज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि खलील अहमद.
महत्वाच्या बातम्या:
ICC Team Of The Tournament: ICC ने महिला विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ केला जाहीर; लॉरा कर्णधार, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, हरमनप्रीत कौरला संघात स्थान नाही!
आणखी वाचा
Comments are closed.