सुपर-8 मध्ये टीम इंडियाची अग्निपरिक्षा! पॉवरप्लेमध्ये ‘ही’ बाब ठरतेयं धोकादायक, तर दक्षिण आफ्रिका…

आता आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ची खरी सुरूवात झाली आहे. यामध्ये सुपर-८चे सामने सुरू झाले आहेत. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा खेळला गेला, जो पावसामुळे रद्द झाला. यामध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. आज (२२ फेब्रुवारी) हा सामना खेळला जाणार असून भारतीय संघाची एक कमकुवत बाजू समोर आली आहे.
या स्पर्धेत भारताचे फलंदाज स्पिन गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले. काही वेळा वरच्या फळीतील फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध धावा करताना अडखळताना दिसले. असे असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची अग्णिपरिक्षाच होणार आहे. कारण त्यांच्याकडे अनुभवी लेफ्ट आर्म स्पिनर केशव महाराज आहे. तो भारतासाठी धोका बनू शकतो. महाराजच्या गोलंदाजीमुळे फलंदाजांचे खेळणे अवघड होते.
या स्पर्धेतील भारताची स्पिनर्सविरोधातील कामगिरी पाहिली तर बाकी संघांच्या तुलनेत खूपच वाईट आहे. या स्पर्धेत ज्या १२ संघांनी किमान २४ षटके ऑफ-स्पिनचा सामना केला आहे, त्यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे, संघाने एका षटकात सात धावा केल्या असून सरासरी १६ राहिली आहे. अंतिम अकरामधील त्या सहा डावखुऱ्या फलंदाजांनी उजव्या हाताच्या ऑफ-स्पिन विरुद्ध प्रति षटक केवळ ६.४ धावा केल्या आहेत, जे अशा प्रकारच्या किमान १० षटकांचा सामना करणाऱ्या संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वाईट कामगिरी आहे, तर सरासरी केवळ ११ आहे.
यामध्ये अभिषेक शर्मा दोन वेळा ऑफ स्पिनवर बाद झाला आहे. त्यामुळे भारताच्या वरच्या फळीत केवळ भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव जो उजव्या हाताचा फलंदाज आहे. ज्याला त्या आव्हानांना तोंड द्यावे लागले असून तोही धावा करण्यात संघर्ष करताना दिसला. त्याने त्याविरुद्ध केवळ २९ चेंडूत ३० धावा काढल्या असून एकदा तो बाद झाला.
दुसरीकडे हार्दिक पांड्याही ऑफ-स्पिनचा अधिक शिकार झाला आहे. त्याने ४ चेंडू खेळताना दोन वेळा विकेट गमावली.
भारताची ही स्थिती पाहता पाकिस्तानने जी चाल चालली तिच दक्षिण आफ्रिकाही खेळू शकते. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने जे केले ते एडेन मार्करमही करू शकतो आणि तसे झाले तर भारत अडचणीत येईल. यामुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सूर्यकुमार फलंदाजीच्या सुरूवातील उजव्या-डाव्याचे कॉम्बिनेशन कसे करतील याकडे लक्ष असेल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक सलमानच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
या सामन्यात केवळ भारतीय फलंदाज नाहीतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजही धोक्यात असतील. भारताकडे लेफ्ट आर्म पेसर अर्शदीप सिंग आहे. त्याने मार्करमला टी२०मध्ये ४६ चेंडू टाकताना ६ वेळा बाद केले आहे. यावेळी त्याने ४५ धावा दिल्या. तसेच वरुण चक्रवर्तीचाही पर्याय भारताकडे आहे. त्याने मार्करमला ६ टी२० डावांमध्ये पाच वेळा बाद केले आहे.
यावरून हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार आहे. तसे अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असली तरी पॉवरप्लेमध्ये सांभाळून खेळावे लागणार आहे.
Comments are closed.