भारताची आणखी एक विक्रमी झेप, 250 टी20 सामने पूर्ण करणारा दुसरा संघ ठरणार!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज (19 सप्टेंबर) आशिया कप 2025 मधील 12वा सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण भारताचा हा 250वा टी20 आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. भारत ही कामगिरी करणारा जगातील केवळ दुसरा देश ठरणार आहे.
भारताने आपला पहिला टी20 सामना 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा जागतिक विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे, मात्र भारताच्या नावावर जे रेकॉर्ड आहेत ते अन्य कोणत्याही संघाला गाठणे कठीण आहे.
भारताने हेड-टू-हेड सामन्यांत प्रत्येक संघाविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवले आहेत.
श्रीलंकेविरुद्ध भारताने सर्वाधिक 22 सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाला 20 तर वेस्ट इंडिजला 19 वेळा धूळ चारली आहे.
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.
सर्वाधिक टी20 सामने खेळणारे संघ:
पाकिस्तान – 275
भारत – 249*
न्यूझीलंड – 235
वेस्ट इंडिज – 228
श्रीलंका – 212
ऑस्ट्रेलिया – 211
इंग्लंड – 210
दक्षिण आफ्रिका – 206
बांगलादेश – 200
भारताचा प्रमुख संघांविरुद्ध हेड-टू-हेड विक्रम (जिंकले || हरले):
श्रीलंका – 22 || 9
ऑस्ट्रेलिया – 20 || 11
वेस्ट इंडिज – 19 || 10
दक्षिण आफ्रिका – 18 || 12
इंग्लंड – 17 || 12
बांगलादेश – 16 || 1
न्यूझीलंड – 14 || 10
पाकिस्तान – 11 || 3
झिंबाब्वे – 10 || 3
आयर्लंड – 8 || 0
अफगाणिस्तान – 8 || 0
युएई – 2 || 0
हाँगकाँग – 1 || 0
नामीबिया – 1 || 0
नेपाळ – 1 || 0
नेदरलँड्स – 1 || 0
यूएसए – 1 || 0
Comments are closed.