भारतही 'कृत्रिम सूर्य' उभारत आहे.
गुजरातमधील प्रयोगशाळेत वैज्ञानिकांकडून संशोधन
वृत्तसंस्था, अहमदाबाद
भारत देखील स्वत:चा कृत्रिम सूर्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. गुजरातमधील एका प्रयोगशाळेत वैज्ञानिक निसर्गाची सर्वात शक्तिशाली प्रक्रिया संलयन म्हणजेच फ्यूजनला पुन्हा साकार करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. चीनने कृत्रिम सूर्यासाठी जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट निर्माण केल्याचे वृत्त अलिकडेच समोर आले होते. आता कृत्रिम सूर्य निर्माण करण्याच्या दिशेने भारतीय वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे.
फ्यूजनद्वारे सूर्य ऊर्जा निर्माण करतो. नाभिकीय संलयनाची ही प्रक्रिया कधीच थांबत नाही, निरंतर सुरू राहते. माणूस या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम सूर्य निर्माण करू शकला तर सर्वात मोठे आव्हान ऊर्जेला निरंतर ठेवण्यासोबत त्यावर नियंत्रण मिळविणे आणि त्याला कायम राखण्याचे असते.
गुजरातच्या इन्स्टीट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी या दिशेने मोठ्या आव्हानावर मात केली आहे. वैज्ञानिकांनी एसएसटी-1 टोकामाक मशीनमध्ये एक शक्तिशाली 82.6 गीगाहर्टत्झ जाइरोट्रॉन नावाच्या उपकरणाला चालू केले आहे, जे हाय फ्रीक्वेंसी मायक्रोवेव ऊर्जेच्या मदतीने प्लाझ्मा स्टेटला दीर्घकाळापर्यंत अत्यंत अधिक तापमानावर तप्त ठेवते. म्हणजेच भारतीय वैज्ञानिकांनी सूर्याप्रमाणे फ्यूजनद्वारे अमर्यादित ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
प्लाझ्मा स्टेट
ठोस, द्रव आणि वायूनंतर प्लाझ्मा पदार्थाची चौथी अवस्था आहे. या स्थितीत अणू स्वत:चे इलेक्ट्रॉन गमावू लागतो. ही अत्यंत उच्च तापमानयुक्त स्थिती असते. एसएसटी-1 म्हणजेच स्टेडी सुपरकंडक्टिंग टोकामाक भारताचे असे फ्यूजन मशीन आहे, ज्याला सूर्याप्रमाणे ऊर्जा देण्याच्या प्रक्रियेला साकार करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. फ्यूजन रिअॅक्टर निर्माण निर्माण करणे अवघड आहे. अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्गी इंधन जाळण्याऐवजी फ्यूजन रिअॅक्टरमध्ये अतिउच्च तापमान आणि दबावादरम्यान न्यूक्लिआयना जोडून ऊर्जा निर्माण केली जाते.
सूर्यापेक्षा 20 अंश जास्त तापमान
भारताच्या वैज्ञानिकांनी फ्यूजनच्या प्रयोगांमध्ये यापूर्वीच 200 दशलक्ष अंश सेल्सिअसपेक्षा अधिक प्लाझ्मा तापमान प्राप्त केले आहे. हे सूर्याच्या नाभीपेक्षा जवळपास 20 पट अधिक तप्त आहे. परंतु इतक्या तापमानापर्यंत पोहोचणे आव्हानाचा केवळ एक हिस्सा आहे. खरे आव्हान अतिउच्च तापमानयुक्त प्लाझ्माला दीर्घकाळापर्यंत स्थिर आणि मर्यादित ठेवणे आहे, जेणेकरून फ्यूजनने निर्मित ऊर्जेला वापरयोग्य करता येऊ शकेल.
Comments are closed.