पठ्ठ्या कंबर कसून करतोय सराव, 10 किलो वजन केलं कमी; इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळणार?

टीम इंडिया पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळावी म्हणून अनेक खेळाडू घाम गाळत आहेत. सरफराज खान सुद्धा वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे.

प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सरफराज इंग्लंड दौऱ्यासाठी दिवसांतून दोनवेळा सराव करत आहे. त्याचबरोबर तंदुरुस्त राहण्यासाठी उकडलेले चिकन आणि उकडलेल्या भाज्या खाण्याला तो प्राधान्य देत आहे. दररोज दोन वेळा सराव आणि नियमीत डाएट करत असल्यामुळे सरफराजने जवळपास 10 किलो वजन कमी केलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला हिंदुस्थानी संघात स्थान मिळणार का नाही? हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. तत्पुर्वी सरफराज खानची टीम इंडियाच्या-अ संघात निवड करण्यात आली आहे. इंडिया अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने आणि हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघाविरुद्ध एक सामना खेळणार आहे. सरफराज खानने टीम इंडियाकडून आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. या 6 सामन्यांमध्ये त्याने 31.70 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत.

Comments are closed.