भारत-अमेरिका व्यापार करारावर संकट, अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचा दिल्लीचा दौरा रद्द : रिपोर्ट

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे तणावग्रस्त आहेत. जोपर्यंत अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ जोपर्यंत भारतात आल्यास अमेरिकेसोबत व्यापार करारावर शिक्कामोर्तब केलं जाई अशी भूमिका घेतली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या रिपोर्टनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील चर्चा स्थगित होऊ शकते.

अमेरिका आणि भारत यांच्यात 25-29 ऑगस्टपर्यंत व्यापार करारावर चर्चा होणार होती. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की अमेरिकेचं शिष्टमंडळ व्यापार करारासंदर्भातील पुढील बैठकीसाठी येणार नाही. अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून नवी तारीख निश्चित केली जाईल, असं सांगितलं जातंय. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत पाच वेळा चर्चा झालेली आहे. सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात येणं अपेक्षित होतं.

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी  भारत आणि अमेरिका यांच्यात द्वीपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांनी बीटीएद्वारे व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय ठेवलं आहे. ते म्हणाले व्यापार कराराबाबत अमेरिकेसोबत आम्ही पूर्णपणे जोडले गेलो आहे. ते म्हणाले की अमेरिका आमचा महत्त्वाचा भागीदार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतानुसार अमेरिका रशियाकडून तेल खरेदी देशांवर दुय्यम टॅरिफ लादणार नाहीत. मात्र, तीन आठवड्यानंतर याबाबत विचार करु, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेनं सेकंडरी टॅरिफ लागू गेल्यास भारतावर प्रभाव पडू शकतो.

व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीपूर्वी ट्रम्प म्हणाले की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचा एक ग्राहक गमावला आहे तो म्हणजे भारत आहे. भारत रशियाकडून 40 टक्के आयात करत होता. चीन देखील मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. दुय्यम टॅरिफ लादल्यास ते त्यांच्यासाठी विनाशकारी ठरेल, असं ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. भारतानं अमेरिकेचा टॅरिफचा निर्णय अन्यायकारक, अयोग्य आणि चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.