सॅम कॉन्स्टासच्या तडाख्यानंतर बुमराहचा पलटवार! बॉक्सिंग-डे कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडलं?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी दिवस पहिला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्ये सुरू आहे. ज्याचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वानंतर भारतीय संघाने अखेरच्या सत्रात दमदार पुनरागमन केले. कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे 19 वर्षीय युवा नवोदित सॅम कॉन्स्टासने सिद्ध केले. सलामीवीरांनी या मालिकेतील ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात केली. सॅम कॉन्स्टासच्या सुरूवातीच्या तडाख्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पलटवार केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या.

पदार्पण सामन्यात सॅम कॉन्स्टासने ठोकले अर्धशतक

बॉक्सिंग डे कसोटीमध्ये सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्याने अपेक्षेप्रमाणे अचूक कामगिरी केली. काही चेंडूंचा सामना केल्यानंतर कॉन्स्टासने मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाजावर आक्रमण केले आणि चौकारांचा पाऊस पाडला. त्याने केवळ 52 चेंडूत 50 धावा केल्या आणि 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

त्यानंतर उर्वरित फलंदाजांचे मनोबलही वाढले आणि त्यांनी अर्धशतके झळकावली. कॉन्स्टासशिवाय खराब फॉर्ममधून जात असलेल्या उस्मान ख्वाजाने 121 चेंडूत 57 धावा केल्या आणि मार्नस लॅबुशेनने 145 चेंडूत 72 धावा केल्या. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 25 षटकात 112 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात 28 षटकांत 64 धावा झाल्या. या काळात त्यांनी केवळ 2 विकेट गमावल्या आणि कांगारू संघ मजबूत तर टीम इंडिया बॅकफूटवर होती.

तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला आला तेव्हा संघाने 2 गडी गमावून 237 धावा केल्या होत्या. यानंतर जसप्रीत बुमराहने सलग विकेट घेत टीम इंडियाचे पुनरागमन केले. प्रथम वॉशिंग्टन सुंदरने मार्नस लॅबुशेनची शिकार केली. त्यानंतर बुमराहने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला शून्य धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हे ही वाचा –

Ind vs Aus 4th Test : ‘गल्ली क्रिकेट खेळतोयस का?’ LIVE मॅचमध्ये रोहित शर्माने मुंबईच्या भाषेत जैस्वालला सुनावले, पाहा Video

Ind vs Aus 4th Test: जाळ अन् धूर सोबतच! सॅम कॉन्स्टासचा राग काढला हेडवर, बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या संकटमोचकाला शुन्यावर केलं ‘क्लीन बोल्ड’, पाहा Video

अधिक पाहा..

Comments are closed.