ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला वनडे सामना, कुठे पाहाल आणि कधी सुरू होईल? जाणून घ्या सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात रविवारपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेद्वारे शुबमन गिल (Shubman gill) वनडे कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli & Rohit Sharma) ही मालिकेत आहेत, आणि दोघेही 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर मैदानावर पुन्हा दिसणार आहेत.
खास गोष्ट म्हणजे आता रोहित आणि विराट शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) या मालिकेमध्ये खेळणार नाही, कारण तो सध्या दुखापतीपासून बरा होत आहे. त्याऐवजी मिचेल मार्श (Mitchell marsh) टीमचे नेतृत्व करत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन (Steve Smith & Marnus Labushen) देखील मालिकेत सहभागी नाहीत.
पहिला वनडे सामना रविवार, 19 ऑक्टोबरला पर्थ स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याचा टॉस सकाळी 8:30 वाजता होईल आणि सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला वनडे तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहू शकता. तसेच, मोबाइलवर जिओहॉटस्टार वर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे हा सामना पाहता येईल.
Comments are closed.