कुलदीप, यशस्वी बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, कुणाला संधी?


IND वि बंद नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया  यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी 20 मालिका देखील होणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या वनडे साठी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा एकेकाळचा सहकारी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं संघ निवडला आहे. आकाश चोप्रानं शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील संघ निवडताना  3 ऑलराऊंडर खेळाडू  आणि 3 वेगवान गोलंदाजांना स्थान दिलं आहे.

आकाश चोप्रानं निवडेल्या संघात कुणाला स्थान?

आकाश चोप्रानं प्लेईंग 11 मध्ये 4 फलंदाज आणि एका विकेटकीपर फलंदाजाला स्थान दिलं आहे. आकाश चोप्रानं शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांना संघात स्थान दिलं आहे. केएल राहुल विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडेल. रोहित शर्मा असल्यानं यशस्वी जयस्वालला त्यानं संधी दिलेली नाही. ध्रुव जुरेल याला देखील संघात स्थान देण्यात आलेलं नाही. स्टार स्पोर्टसकडून शेअर केलेल्या व्हिडिओत फिरकीपटू म्हणून आकाश चोप्रानं अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिलं आहे.  तर, चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संघात स्थान आकाश चोप्रानं दिलं नाही.

आकाश चोप्रानं हार्दिक पांड्या जखमी असल्यानं त्याच्या जागी नितीशकुमार रेड्डीला स्थान दिलं आहे. मात्र, नितीश कुमार रेड्डीकडे एकदिवसीय सामन्यांचा अनुभव नाही. त्याला संधी मिळाल्यास तो पर्थमध्ये पदार्पण करेल. चोप्रानंतीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिलं आहे. यामध्ये हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगला स्थान दिलं गेलं आहे.

आकाश चोप्रांथाचे आकाश चोप्राचे खेळणे

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

वनडे मालिकेसाठी भारताचा संघ (Team India For ODI Matches)

शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), केएल राहुल (विकेटकीपर), नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा,मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक- (Ind vs Aus ODI Schedule)

1. पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (पर्थ)
2. दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अ‍ॅडिलेड)
3. तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (सिडनी)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.