रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार,224 दिवसांची प्रतीक्षा संपणार
पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. यावेळी भारताचा कॅप्टन शुभमन गिल आहे तर मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता ही मॅच सुरु होणार आहे.
कॅप्टन म्हणून शुभमन गिलची ही पहिली वनडे मालिका आहे. शुभमनच्या नेतृत्त्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली संघातून खेळतील. टीम इंडियाच्या जर्सीत रोहित शर्मा आणि विराट कोहली 224 दिवसानंतर पाहायला मिळतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळले होते.
रोहित शर्मा आणि विराट कोहली इतका वेळ संघाबाहेर असल्याची कदाचित पहिली वेळ असावी. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते दोघे फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहेत.
भारतीय क्रिकेटमध्ये आता स्थित्यंतर होत असल्यानं युवा खेळाडू टीममध्ये दाखल होत आहेत. यामुळं रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल, असं सांगितलं जातंय. दोघे कसोटी आणि टी 20 क्रिकेट खेळत नसले तरी त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत.
भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यर, पाचव्या स्थानावर केएल राहुल फलदाजी करेल.त्याच्याकडेच विकेटकीपिंगची जबाबदारी होती. ऑलराऊंडर म्हणून अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डीला संधी मिळू शकते. त्याशिवाय कुलदीप यादवला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजी करतील.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाला देखील दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स संघात नसेल. तर, मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असेल. कॅमरुन ग्रीन देखील संघाबाहेर गेला आहे.
भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया इलेव्हन: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुह्नेमन, मार्नस लॅबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू स्टार, मिचेल शॉर्ट.
आणखी वाचा
Comments are closed.