सोनी की जिओ हॉटस्टार? एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार भारत-इंग्लंड LIVE सामना, फुकटात कुठे
इंग्लंड विरुद्ध भारत 1ली T20 थेट प्रवाह: टी-20 क्रिकेटमधील अव्वल स्थानी असलेली टीम इंडिया आता एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पत्कराव्या लागलेल्या धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघाचे पुढील लक्ष्य बलाढ्य इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत धूळ चारण्याचे असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 1 जुलै (बुधवार) पासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवला जाईल.
दुसरीकडे, इंग्लंडचा संघ आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताकडून मिळालेल्या 7 धावांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे इंग्लिश संघाचा प्रयत्न घरच्या मैदानावर भारताकडून जुना हिशोब चुकता करण्याचा असेल. तर, नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरच्या खांद्यावर भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, कर्णधार म्हणून पहिली टी- 20 मालिका जिंकण्याचा त्याचा मानस असेल.
सामना कधी, कुठे अन् किती वाजता होणार? (India Vs England Live Streaming Details)
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना 1 जुलै बुधवार रोजी चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल, तर सामन्याचा टॉस (फेक) रात्री 9:30 वाजता होईल. या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर (Sony Sports Network) उपलब्ध असेल. तसेच ‘डीडी नॅशनल’वर (DD National) हा सामना मोफत पाहता येईल. डिजिटल प्रेक्षकांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्हवर नसून जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर केले जाईल.
IND vs ENG टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
- 1 जुलै 2026 : पहिला टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 4 जुलै 2026 : दुसरा टी-20 सामना, संध्याकाळी 7:00 वाजता
- 7 जुलै 2026 : तिसरा टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 9 जुलै 2026 : चौथा टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 11 जुलै 2026 : पाचवा टी-20 सामना, संध्याकाळी 7:00 वाजता
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, सूर्यांश शेडगे, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
इंग्लंड संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन (यष्टिरक्षक), जेकब बेथेल, जोस बटलर (यष्टिरक्षक), जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स (यष्टिरक्षक), सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोश टंग, ल्यूक वूड.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.