भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडचा एका तासात निर्णय; जोफ्रा आर्चरनंतर आणखी एका घातक गोलंदाजाला

भारत वि इंग्लंडची दुसरी कसोटी: शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्त्वात भारतानं (India vs England 2nd Test) इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

भारतानं इंग्लंड पुढं विजयासाठी 608 धावांचं आव्हानं ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 271 धावा करता आल्या. आकाश दीपनं 6 विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याला मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरनं साथ दिली. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पराभव होताच इंग्लंडचा मोठा निर्णय-

दुसऱ्या कसोटीत पराभव होताच इंग्लंडच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. जोफ्रा आर्चरनंतर अजून एक घातक गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव होताच एका तासात इंग्लंडने संघात बदल केला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनचा 15 सदस्यांचा संघात समावेश केला आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडने जोफ्रा आर्चरला देखील संघात समावेश केला होता. मात्र जोफ्रा आर्चरला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-

बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर, जॅकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग आणि क्रिस वोक्स

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-

यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्नाधर), करुन नायर, ish षभ पंत, रवींद्र जडेजा, नितीष कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिलाज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रित बुमरह, कुलुशुश ज्युलेल, अर्शादिप सिंग

https://www.youtube.com/watch?v=wlxjpnfmlz0

संबंधित बातमी:

WTC Points Table: भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही, कोण आहे आघाडीवर?

Virat Kohli India vs England 2nd Test: भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवताच विराट कोहलीचं ट्विट; 3 खेळाडूंची घेतली नावं, नेमकं काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.