अविश्वसनीय! मँचेस्टर कसोटी ड्राॅ, जडेजा-सुंदरच्या खेळीने जिंकली मने! स्टोक्सचे सर्व डावपेच फसले

भारत वि इंग्लंड चौथी कसोटी सामन्यात: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेलेला चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. इंग्लंडने 311 धावांची मोठी आघाडी मिळवली असतानाही, टीम इंडियाने हा सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. सामन्याच्या पाचव्या दिवशी 3 भारतीय खेळाडूंनी शतके झळकावली आणि भारताने दुसऱ्या डावात 425 धावा केल्या. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारताने मँचेस्टर कसोटी ड्रॉ केली. मँचेस्टरमध्ये भारतीय संघाचा कधीही न जिंकण्याचा सिलसिला कायम आहे. येथे टीम इंडियाचा हा सहावा ड्रॉ आहे, तर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्यांना 4 पराभव पत्करावे लागले आहेत. (Old Trafford Test record India)

भारताचा पहिला डाव 358 धावांवर आटोपला होता, तर इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा 0 च्या धावसंख्येवर संघाने 2 विकेट्स गमावल्या होत्या. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्याच षटकात शून्य धावांवर आपले विकेट्स गमावले होते.

भारतासमोर 311 धावांची विशाल आघाडी पार करण्याचे मोठे लक्ष्य होते. 0 धावांवर 2 विकेट्स गमावले असताना, केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिलने परिपक्वता दाखवली. चौथ्या दिवसाचे तिसरे सत्र पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिले, कारण गिल आणि राहुल यांनी केवळ आपले विकेट्स वाचवले नाहीत, तर धावफलकही पुढे नेला. पाचवा दिवस उजाडला तेव्हा केएल राहुल दुर्दैवाचा बळी ठरला आणि 90 धावांवर बाद झाला.

कर्णधार गिल पुढे सरसावला आणि मालिकेतील चौथे शतक झळकावले, पण शतक पूर्ण केल्यानंतर थोड्याच वेळात 103 धावा काढून तो बाद झाला. राहुल आणि गिलने 188 धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाची पायाभरणी केली होती. (KL Rahul And Shubman Gill partnership)

सहसा पंत ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, पण दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरला ‘प्रमोशन’ देण्यात आले. 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुंदरने क्लासिक कसोटी खेळी खेळली. कर्णधार गिल बाद झाला असताना, त्याने एक बाजू सांभाळून ठेवली, तर दुसऱ्या बाजूने रवींद्र जडेजाही स्थिरावला होता. (India comeback in Test match)

जडेजा आणि सुंदर यांच्यात नाबाद 203 धावांची भागीदारी झाली. आधी जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण करून ‘स्वोर्ड सेलिब्रेशन’ केले, तर सुंदरचे शतक पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघांनी सामना ड्रॉ करण्यावर हस्तांदोलन केले. याआधी थोड्या वेळापूर्वीच बेन स्टोक्सला सामना संपवायचा होता, पण भारतीय मॅनेजमेंटने जडेजा आणि सुंदरचे शतक पूर्ण झाल्यानंतरच ड्रॉसाठी होकार दिला. (India vs England 4th Test Draw)

Comments are closed.