IND vs ENG: भारताविरुद्ध कशी असेल इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन? सेमीफायनलसाठी संघात करणार मोठा बदल

टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये आता भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना होणार आहे. 5 मार्च 2026 रोजी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही देशांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. सध्याच्या फॉर्मनुसार भारत हा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
गेल्या टी-20 विश्वचषकात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता, त्यामुळे आता इंग्लिश संघ त्या पराभवाचा बदला घेण्याच्या आणि फायनलमध्ये पोहोचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडची ‘प्लेइंग इलेव्हन’ कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात इंग्लंडच्या संघ रचनेवर सर्वांची नजर असेल. गेल्या सामन्यात रेहान अहमद खेळला होता, पण हा सामना वानखेडेवर आहे जिथे खेळपट्टीवर चांगला बाऊन्स मिळतो. त्यामुळे त्याच्या जागी जेमी ओव्हरटनला संधी मिळू शकते. इंग्लंडकडे लियाम डॉसन, आदिल रशीद आणि विल जॅक्सच्या रूपाने आधीच तीन उत्तम फिरकी पर्याय उपलब्ध आहेत. फलंदाजीमध्ये जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांच्या कामगिरीवर चाहत्यांची मदार असेल.
इंग्लंडची संभाव्य प्लेइंग 11: फिल साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.
भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यांत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. असे दिसते की, भारताने या विश्वचषकासाठी आपली सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हन शोधून काढली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात (ओपनिंग) करत आहेत, तर ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. गोलंदाजीची मुख्य धुरा जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल. विजयी संघात बदल करण्याची शक्यता खूपच कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
Comments are closed.