आयएनडी वि इंजिन टेस्ट – तीन विक्रमनवार शुबमन गिलची नझर

हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने आधीच अनेक ऐतिहासिक विक्रम मोडलेत. मात्र मँचेस्टर कसोटीत ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्याला एक–दोन नव्हे तर तीन-तीन विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे. त्यापैकी किती विक्रमला तो गवसणी घालतो आणि किती विक्रम थोडक्यात हुकतात ते 23 जुलैपासून कळेलच.

गिलने आतापर्यंत गेल्या तीन कसोटी सामन्यांत 607 धावा जमवल्या असून पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद युसूफच्या इंग्लंडमधील एका मालिकेत 631 धावांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त 25 धावांनी कराव्या लागणार आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध 2006 च्या द्विपक्षीय मालिकेत हा विक्रम केला होता. तसेच ग्रॅहम गूच यांचा 752 धावांचा विक्रमही दृष्टिपथात आहे.

उभय देशांमध्ये झालेल्या मालिकेत सर्वाधिक धावांचा हा विक्रम गूच यांनी 1990 साली रचला होता. त्यासाठी गिलला फक्त 146 धावांचे लक्ष्य गाठणारी खेळी करावी लागेल. ही धावसंख्या गाठल्यानंतर तो इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधारही ठरेल. 1990 साली गूच हा इंग्लंडचा कर्णधारही होता. त्यानंतर अनेक विक्रम गिलची वाट पाहाताहेत. फक्त लीड्स आणि एजबॅस्टनप्रमाणे मँचेस्टर आणि नॉटिंगहॅमला त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडायला हवा.

Comments are closed.