भारत-इंग्लंड कसोटीत पावसानं घातला खोळंबा! आता काय होणार निकालाचं? नियम काय सांगतात?

भारत वि इंग्लंडची दुसरी कसोटी: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन कसोटीचा आज (6 जुलै) पाचवा दिवस आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होणार होता, पण पावसामुळे खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला आहे. एजबेस्टन मैदानावर जोरदार पाऊस सुरू आहे. जर हा पाऊस सतत सुरू राहिला, तर पाचव्या दिवसाचा खेळ बिघडू शकतो. (India vs England Test match rain delay)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज निर्णायक दिवस आहे. सामना शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे, पण पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाने खोळंबा घातला आहे. जर हा पाऊस सुरूच राहिला आणि सामन्याचा वेळ संपला, तर हा सामना अनिर्णीत (ड्रॉ) घोषित केला जाईल. एजबेस्टन कसोटी सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. (India vs England Test no reserve day) हा एक सामान्य कसोटी सामना आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात येतो. (WTC final reserve day rule) इतर सर्व सामन्यांचा निकाल 5 दिवसांच्या आत लागतो. जर निकाल लागला नाही, तर सामना ड्रॉ मानला जातो. (Test match draw rule rain)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवसाचा खेळ खूप वेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात पहिल्या सत्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि तो अगदी सुरुवातीलाच खरा ठरला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही पावसामुळे सामना थांबू शकतो. अशा परिस्थितीत याचा थेट फायदा इंग्लंडला होऊ शकतो. इंग्लंडला हा एजबस्टन कसोटी सामना जिंकण्यासाठी 536 धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी इंग्लंडचे 7 विकेट्स घेणे आवश्यक आहे. जर पाचव्या दिवशीचा खूप वेळ पावसात गेला, तर हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पाऊस थांबल्यानंतर वारे जोरात वाहतील आणि अशा परिस्थितीत भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांना याचा फायदा होऊ शकतो.

Comments are closed.