IND vs ENG: भारत- इंग्लंड संघात कोण जिंकेल कसोटी मालिका? सचिन तेंडुलकर यांनी केली मोठी भविष्यवाणी!
क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी भारत इंग्लंड मालिकेविषयी मोठी भविष्यवाणी केलेली आहे. टीम इंडिया (Team india) यावेळी नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यामुळे शुबमन गिलसाठी (Shubman gill) हे खूप मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या मैदानावर युवा संघासोबत टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध मालिका खेळत आहे. तरी देखील सचिन तेंडुलकर यांचं म्हणणं आहे की, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल.
सचिन यांनी भविष्यवाणी करत म्हटले की, टीम इंडिया या मालिकेला 3-1 त्यांच्या नावावर करेल. टीम इंडियाचं रेकॉर्ड इंग्लंडच्या मैदानावर काही खास राहिलेलं नाही. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 67 सामन्यांमध्ये भारतीय संघाला फक्त 9 सामन्यात विजय मिळाला आहे. इंग्लंडच्या मैदानावर शेवटची टीम इंडियाने कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती. म्हणजेच मागच्या 18 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये भारतीय संघाने एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
Comments are closed.