अभिषेक, इशान OUT, बुमराह IN…; नामिबियाविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची Playing XI

भारत विरुद्ध नामिबिया T20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) आज भारत आणि नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात भारत आणि नामिबिया संघ भिडतील. मात्र त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

नामिबियाविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) खेळण्याबाबत साशंकता आहे. तर सराव करताना इशान किशनला (Ishan Kishan) दुखापत झाल्याने त्यालाही आजच्या सामन्यातून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा पोटात संसर्ग झाल्यानं रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती भारताचा फलंदाज तिलक वर्मा यानं दिलं आहे.

अभिषेक शर्माची प्रकृती उद्या सामन्याच्या वेळी कशी असेल त्यावर त्याला सामन्यात संधी देणार की नाही ठरणार असल्याचं वर्मानं म्हटलं. दरम्यान, भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्ताननं दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुणांसह ते पहिल्या स्थानावर आहेत. नामिबियाला पराभूत करुन टीम इंडिया पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचू शकते.

नामिबियाविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन- (Team India Playing XI vs Namibia)

संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

टी-20 विश्वचषकासाठी संपूर्ण टीम इंडियाचा संघ- (Team India Full Squad T20 WC 2026)

इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026 Latest Points Table: टी-20 विश्वचषकाच्या Points Table मध्ये उलथापालथ; ग्रुप C मध्ये रंजक वळण, उर्वरीत 3 ग्रुपमध्ये कोण कोण अव्वल?, A टू Z माहिती

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर

आणखी वाचा

Comments are closed.