Champions Trophy Final 2025 – हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लढत, रविवारी होणार फायनल

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली.ऑस्ट्रेलियाला नमवत हिंदुस्थानने आधीच फायनलमध्ये धडक मारली आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दुबईत येत्या रविवारी होणार आहे.

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील फायनल 9 मार्च म्हणजे येत्या रविवारी दुबईत होणार आहे. दुबईत हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामना सुरू होईल. त्यापूर्वी दुपारी 2 वाजता रोहित शर्मा आणि मिचेल सेंटनर यांच्यात नाणेफेक होईल.

Steve Smith announces retirement – चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभव जिव्हारी लागला, स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रीकेचा 50 धावांनी पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला.न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 ओवरमध्ये 6 गडी गमवत 362 धावा केल्या.प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रीकेला 312 धावाच करता आल्या.

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

Comments are closed.