भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z मा
भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम T20 विश्वचषक 2026 : टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून हा सामना रविवारी, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र जर अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण झाला तर काय होईल, कोण विजेता ठरेल आणि रिझर्व्ह डे आहे का? याबाबतचे नियम जाणून घेऊया….
𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐚𝐰𝐚𝐢𝐭𝐬 ⏳
भारत आणि न्यूझीलंड अंतिम वैभवाचा पाठलाग करतील #T20WorldCup अंतिम 🏆 pic.twitter.com/L1iPOTLfbX
— ICC (@ICC) 5 मार्च 2026
फायनलसाठी रिझर्व्ह डेची तरतूद
आयसीसीने टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. नियोजित वेळेनुसार 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. मात्र पावसामुळे त्या दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर 9 मार्च (सोमवार) हा दिवस रिझर्व्ह डे म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.
जर 8 मार्चला काही षटके खेळल्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला, तर 9 मार्चला तो सामना जिथे थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू केला जाईल. पण 8 मार्चला एकही चेंडू टाकता आला नाही, तर 9 मार्चला सामना नव्याने सुरू केला जाईल.
किमान 10-10 षटकांचा सामना आवश्यक
अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे. सामान्य टी-20 सामन्यांमध्ये 5-5 षटकांतही निकाल लागू शकतो, मात्र आयसीसीच्या विश्वचषक नियमांनुसार फायनलमध्ये दोन्ही संघांना किमान 10 षटके खेळणे बंधनकारक आहे.
सामना झाला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते…
फायनल सामन्यासाठी आयसीसीने कट-ऑफ टाइममध्ये 90 मिनिटांची अतिरिक्त मुदत ठेवली आहे. तर रिझर्व्ह डेच्या दिवशी हा अतिरिक्त वेळ 120 मिनिटांचा असेल. मात्र रिझर्व्ह डेच्या दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि निकाल लागू शकला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
अहमदाबादमध्ये काय आहे हवामान अंदाज? (Ahmedabad Weather Forecast Update)
दरम्यान, हवामान अंदाजानुसार रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पूर्णपणे पार पडण्याची शक्यता अधिक आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.