तिलक बाहेर, हार्दिकचं पुनरागमन! टीम इंडियाचा कर्णधार पुन्हा बदलणार? न्यूझीलंड मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारी 2026 पासून तीन सामन्यांची वनडे (एकदिवसीय) मालिका सुरू होत आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असली, तरी वनडे मालिकेसाठी अद्याप अधिकृत संघ जाहीर होणे बाकी आहे.

शुबमन गिल (Shubman gill) दुखापतीमुळे संघाबाहेर होता, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केएल राहुलने (KL Rahul) नेतृत्व केले होते. आता शुबमन गिल संघात परतत असल्याने कर्णधारपद पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि शुबमन गिल या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावल्यामुळे ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) या मालिकेत स्थान मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाऊ शकते, तर तिलक वर्माला (Tilak Verma) या मालिकेतून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना: 11 जानेवारी
दुसरा सामना: 14 जानेवारी
तिसरा सामना: 18 जानेवारी

Comments are closed.