भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक समोर! जाणून घ्या सामने कुठे पाहता येतील?

भारतीय क्रिकेट संघ 2026 या नवीन वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने करणार आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल आणि त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्मात दिसला होता, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फलंदाजीनेही चांगलीच फटकेबाजी केली होती.

आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही हे दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानावर धुमाकूळ घालताना दिसतील. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर, मोबाईलवर जिओ हॉटस्टार ॲप वर पाहू शकता.

वनडे मालिकेला 11 जानेवारी 2026 सुरुवात होणार आहे, तसेच अंतिम सामना 18 जानेवारी 2026 रोजी होईल. टी-20 मालिकेला सुरुवात 21 जानेवारी होईल आणि अंतिम सामना 29 जानेवारी 2026 रोजी खेळला जाणार आहे.

Comments are closed.