IND vs NZ: न्यूझीलंडचे ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियाच्या अडचणी वाढवणार! टी-20 विश्वचषक फायनलमध्ये राहावं लागणार सावध

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup Final) चा अंतिम सामना होणार असून, या मोठ्या लढतीसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. मात्र, न्यूझीलंडला हलक्यात घेणे टीम इंडियाला महागात पडू शकते. कीवी संघातील काही खेळाडू भारताची डोकेदुखी वाढवू शकतात, त्यामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला या खेळाडूंपासून सावध राहण्याची गरज आहे.

न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर (Openers) फिन ॲलन आणि टिम सायफर्ट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. हे दोन्ही फलंदाज सातत्याने धावांचा पाऊस पाडत आहेत, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यांच्यापासून सावध राहावे लागेल.
याशिवाय, कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Sentner) देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही माध्यमांतून कमाल करत आहे. टीम इंडियाला सँटनरसाठी विशेष रणनीती (Special Plan) आखावी लागेल.

Comments are closed.